श्रीमती अश्विनी भिडे, भाप्रसे
व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC)मुंबई महानगर शहरातील रहदारी व वाहतुकीचे चित्र सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासन, मेट्रो रेल प्रकल्प राबविण्यास कटिबद्ध आहे.
मुंबई मेट्रो बृहत आराखड्याप्रमाणे मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये १५३ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्याच बृहत आराखड्याची अंमलबजावणी कण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या ५०-५०% भागीदारीमध्ये सुरु करण्यात आलेली ही एक संयुक्त कंपनी आहे. कंपनी अधिनियम १९५६ नुसार ही कंपनी स्थापन झाली आहे.
उपनगरीय रेल्वेने जोडल्या न गेलेल्या परिसरांना रेल आधारित सुविधा पुरविणे आणि ५०० मीटर ते १ कि.मी. अंतरावर ही सुविधा उपलब्ध करणे हा कॉर्पोरेशनचा उद्देश आहे.
ह्या प्रकल्पामुळे सर्वसामान्य जनतेला मिळणारे फायदे असे:
- प्रवासाच्या वेळेत बचत
- प्रदूषणात घट
- रस्त्यांवरील गर्दीत घट
- वातानुकुलीत आरामदायी प्रवास
- रस्त्यांवरील तनावापासून मुक्ति आणि मोठ्या प्रमाणात उर्जेची बचत
- कंटाळवाणा रस्ते प्रवास नाही, उर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत
- विमानतळ, ६ मध्यवर्ती व्यावसायिक केंद्रे, ३० विद्यापीठे, १३ इस्पितळे जोडली जाणार
- ज्येष्ठ नागरिक / विशेष गरजा भासणाऱ्यासाठी उद्वाहने / सरकत्या जिन्याची सोय
- बंद दरवाजांमुळे मार्ग उल्लंघन टळणार, प्रवाशांची सुरक्षितता वाढणार
प्रकल्पाची काही अन्य वैशिष्ट्ये अशी:
- स्मार्ट प्रकाश योजना असणारी स्थानके
- फलाटांसाठी विशेष संरक्षक दरवाजे
- आधुनिक व उर्जाक्षम इंजिन व डबे
- स्थानकांवर एएफसी / स्मार्ट कार्डद्वारेच प्रवेश
- अत्याधुनिक उद्वाहने / सरकते जिने