आरामदायी प्रवास
आज उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये भरपूर गर्दी असते. जिथे फक्त १,७५० प्रवासी बसू शकतात, तिथे ५००० लोक प्रवास करीत असतात. मेट्रो -३ मुळे हा भार जवळपास १५% कमी होणे अपेक्षित आहे. संपूर्ण ट्रेन वातानुकुलीत राहणार असल्यामुळे प्रवाश्यांना आवाजाच्या / धुळीच्या प्रदूषणाचा त्रास होणार नाही व त्यांचा प्रवास जास्त आरामदायी होईल.न जोडलेले भाग जोडणे
मुंबई मेट्रो -३ ही कुलाबा–वांद्रे-सिप्झ पट्ट्यामधून धावेल व नरीमन पॉइंट, वांद्रे–कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परळ, गोरेगाव इत्यादी आर्थिक केंद्रांना सुद्धा जोडेल. मेट्रो मुळे विमानतळ, नरीमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, सिप्झ व एमआयडीसी प्रथमच जोडले जातील. त्याशिवाय मुंबई मेट्रो -३ च्या मार्गामुळे चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी ऐतिहासिक वारसा असलेली स्थानके सुद्धा जोडली जातील.इतिहासात डोकावताना
कुलाबा स्थानक १८७३ मध्ये सुरु करण्यात आले होते पण १९३० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ८५ वर्षानंतर मुंबई मेट्रो -३ मुळे कुलाबा रेल्वे नकाशावर परत येईल.इतर वाहतूक सुविधांशी जोडणी
चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी येथे प्रवाश्यांना मेट्रो-३ व इतर उपनगरीय रेल्वे मार्गावरील गाडयांची अदलाबदल करता येईल. शहराच्या रेल्वे नसलेल्या भागाच्या जवळ रेल्वे सेवा घेऊन जाण्यासाठी; सध्याच्या उपनगरीय रेल्वे गाड्या मुंबई मेट्रो -३ च्या बरोबरीने प्रयत्न करतील.रस्त्यांवरील कोंडी कमी करणे
मुंबई मेट्रो -३ मुळे रहदारीचा होणारा खोळंबा टाळता येईल व त्यात वाया जाणारा महत्वाचा वेळ वाचवता येईल. एकदा अंमलबजावणी झाल्यावर मुंबई मेट्रो -३ मुळे ह्या पट्ट्यातील रहदारी सुमारे ३५% ने किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.प्रवासाच्या वेळेत घट
सध्या कफ परेड ते विमानतळ हे अंतर पूर्ण करण्यासाठी १०० मिनिटे लागतात, पण मुंबई मेट्रो -३ मुळे हाच वेळ ५० मिनिटे होईल.प्रवासा दरम्यान आराम व सुरक्षा
सरकते जिने / उद्वाहक, सुरक्षित फलाट, रेल्वे सेवेचे बंद दरवाजे, सीसीटीव्ही कव्हरेज, यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण यांना वाढीव सुरक्षा मिळेल. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून प्रवेश मिळणार असल्यामुळे ट्रॅक ओलांडणे बंद होईल. प्लॅटफॉर्म वर स्क्रीन डोअर असल्यामुळे प्रवाश्यांची सुरक्षितता वाढेल व चढताना / उतरताना अपघात होण्याची शक्यता कमी होईल.किमान खर्चात कमाल सुविधा
किमान खर्च करून प्रवाश्यांना सोयीच्या व आरामदायी प्रवासाचा आनंद पुरविण्याचा मुंबई मेट्रो -३ चा उद्देश आहे. प्रवासी मुंबई मेट्रो -३ च्या वातानुकुलीत डब्यातून प्रवास करतील, त्यांना रस्त्यावर रहदारी मध्ये वेळ घालवावा लागणार नाही व परवडणाऱ्या किमतीत सुखाचा प्रवास करण्याचा अनुभव मिळेल.पर्यावरणीय लाभ
मेट्रो -३ मुळे हवेच्या प्रदूषणात घट होणे अपेक्षित आहे व हवेच्या गुणवत्तेत सुद्धा सुधारणा अपेक्षित आहे. पर्वावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई मेट्रो -३ कटिबद्ध आहे. जसे प्रवासी प्रवासाची पारंपरिक साधने सोडून मेट्रोमधून प्रवास करण्यास सुरवात करतील, तसतशी मुंबई सारख्या शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे होणाऱ्या हवा आणि आवाजाच्या प्रदूषणात घट होईल.पर्यावरण पूरक व कार्यक्षम वाहतूक
मुंबई मेट्रो -३ च्या गाड्यांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ब्रेकिंग मधून ४०% रिजनरेटीव एनर्जी प्राप्त होईल. प्रकलपाची अंमलबजावणी झाल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन सुरवातीपासूनच सुमारे १.०० लाख टनाने कमी होईल.जीवाश्म इंधन बचत
दररोज ४.५० लाख वाहने रस्त्यावर येणार नसल्यामुळे रोज २.५ लाख लिटर इंधनाची म्हणजे वर्षाला रु ५५० कोटी बचत होईलआर्थिक लाभ
मुंबई मेट्रो -३ मुळे व्यवसायात जास्त गुंतवणूक होईल व बांधकाम करताना व झाल्यानंतर रोजगार निर्मिती होईल.