मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ए इ कॉम एशिया यांचे नेतृत्व असलेल्या समूहास (पडेको-Padeco जपान, एलबिजी-LBG Inc., युएसए-USA आणि एगीस रेल – Egis Rail यांचा संयुक्त उपक्रम) जायका-JICA च्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुणवत्ता व मूल्याधारित सल्ल्यासाठी मुंबई मेट्रो-३ चे सर्वसामान्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.
सर्वसामान्य सल्लागार हे प्रकल्पाचे आरेखन, देखरेख, गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता व कंत्राटी व्यवस्थापनाबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मदत करण्यासाठी नेमलेले आहेत. सर्वसामान्य सल्लागारांच्या एकूण कामाचा आवाका खालील प्रमाणे असेल:
- स्थापत्य कामांच्या निविदांचे मूल्यमापन करण्यासाठी मदत करणे
- तपशीलवार आरेखनांची छाननी व तपासणी करणे
- प्रणालीचे घटक, इंजिने व डबे, लोहमार्गाचे काम यासाठी दस्तऐवज व निविदेचे आरेखन
- पुरवठा व उभारणी सहित बांधकामावर देखरेख करणे
- कामावर देखरेख ठेऊन सुरक्षितता, गुणवत्ता व पर्यावरणीय पैलूंची खात्री करून घेणे
- सर्व प्रणाली घटकांचे कार्यान्वयन करणे
- संपूर्ण प्रणालीची चाचणी व कार्यान्वयन करणे
- परिचालन व देखभाल नियम पुस्तिकांचे अंतिम आरेखन करणे