आमचे स्वप्न
आरामदायी, सहज, सुरक्षित आणि आनंददायी प्रवास उपलब्ध करून मुंबईतील वाहतुकीची व्याख्या बदलणे हे आमचे स्वप्न आहे.
- सर्व क्षेत्रामध्ये व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून एक जागतिक दर्जाची संस्था बनण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची महत्वाकांक्षा आहे
- जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक व सर्वसमावेशक जलद परिवहन प्रणालीची बांधणी करण्याची आमची महात्वकांक्षा आहे
- मुंबईतील प्रवाशांना उत्कृष्ट प्रवास प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत
आमचे ध्येय
- एक विश्वसनीय, शाश्वत व उर्जाक्षम मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करणे
- भारतातील मेट्रो रेल्वे परिवहन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणे व जगातील उत्कृष्ट मेट्रो रेल्वे प्रणालींपैकी एक बनणे
- सर्व नागरिकांना जबाबदारीने सेवा देणे व ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले व विशेष गरजा भासणाऱ्या नागरिकांकडे विशेष लक्ष देणे
- शहरामध्ये जलद, सुरक्षित, नियमित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्यासाठी उत्कृष्ट प्रतीची प्रमाणके अंगिकारणे
- भविष्यातील वाढीच्या दृष्टीकोणाबाबत स्वतंत्र असणे व स्वावलंबी संस्था होण्यासाठी झटणे
- आमच्याशी व्यवहार करणे सुलभ व्हावे म्हणून आमच्या सर्व भागधारकांना अभिमानपूर्वक व प्रतिष्ठापूर्वक परिपूर्ण सेवा पुरविणे
- प्रतिसादात्मक, परिणामकारक, पारदर्शी व विनयशील राहून व्यावसायिक दृष्टीकोन कायम राखणे
आमची मुल्ये
कायदेशीर अधिकार, सार्वजनिक आरोग्य व एकूण हिताचा योग्य असा विचार करून सार्वजनिक व एकूण हिताचा नसलेला कोणताही प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन हाती घेणार नाही
अर्जदारांसाठी असणाऱ्या नोकरीसाठीच्या संधींमध्ये धर्म, वर्ण, लिंग, वैवाहिक दर्जा, राष्ट्रीयत्व, जात, वंश किंवा पंथ या आधारावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कोणताही भेदभाव करणार नाही.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने चुकीच्या उद्देशाने प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही भेटवस्तू / देणगी किंवा अन्य लाभ (कोणत्याही पद्धतीने) घेतलेला किंवा दिलेला असल्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन क्षमाशील राहणार नाही.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, त्यांच्या प्रकल्पामध्ये अंतर्भूत असणाऱ्या लोकांना स्वच्छ, आरोग्यदायक व सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घेईल
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच अधिकाधिक समाधान देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणके गाठणाऱ्या सर्वोत्तम प्रतीच्या सेवा देण्याचा प्रयत्न करील
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन समाजातील लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. निगमिय सामाजिक जबाबदारी अंतर्गत वास्तव्य करण्यासाठी आपला समाज सुरक्षित, उत्तम व पर्यावरणप्रिय होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करीत राहू
व्यवसाय व प्रकल्पाच्या संदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनशी संबंधित असणारे सल्लागार, कंत्राटदार आणि पुरवठादार हे संस्थेकडून योग्य ती परवानगी घेतल्याशिवाय मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनचे प्रतिनिधित्व करणार नाहीत
सर्व प्रकारच्या अन्योन्यक्रियांमध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन नीतीमत्ता प्रमाणके, प्रामाणिकपणा, सचोटी व व्यावसायिकतेचे पालन करेल. अशा सर्व व्यवहारांमध्ये योग्य व पारदर्शक आचारसंहितेचे पालन केले जाईल
प्राधिकृत व्यक्तीशिवाय कोणीही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची मालमत्ता वापरणार नाही याची काळजी घेण्यात येईल. मालमत्तेचे संपादन अक्कलहुशारीने व व्यावसायिक कारणासाठीच केले जाईल
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या लेखी संमती / अनुमती शिवाय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इतर कोणत्याही संस्थेला आपल्या सेवा देता येणार नाहीत किंवा स्वतंत्रपणे काम करता येणार नाही
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याला ज्ञात असलेली खरी माहितीच पुरविली पाहिजे व पुरविलेली माहिती सत्य असेल याची त्याने काळजी घेतली पाहिजे. पुरविलेल्या माहितीच्या अचूकपणासाठी तो/ती संपूर्णपणे जबाबदार असेल. व त्याने / तिने त्या माहितीची गोपनीयता सांभाळणे आवश्यक असेल
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे व संस्थेसाठी एक महत्वाचा घटक होण्यासाठी सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आपल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचा अभिमान आहे व त्यांनी संस्थेला नावलौकिक प्राप्त करून द्यावा असे त्यांच्याकडून अपेक्षित आहे
आपल्या कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांना उपलब्ध असलेल्या कंपनीच्या किंवा कंत्राटदार, पुरवठादार इत्यादी गटांच्या माहितीचा फायदा घेणार नाहीत किंवा तो घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला मदत सुद्धा करणार नाहीत, याची मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशन काळजी घेईल